Friday 27 June 2014

संतांवरील श्रद्धेला सोशल मीडियावरून ठेच न पोचविण्यासाठी सायबर कायदा – तावडे

लोकसत्ता   पुणे     Published: Thursday, June 26, 2014

बातमी

सोशल मीडियाच्या माध्यमातून संतांवरील श्रद्धेला ठेच पोचू नये, यासाठी आमच्या पक्षाचे सरकार आल्यावर नवा सायबर कायदा आणू, असे आश्वासन भाजपचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी दिले.
विनोद तावडे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस गुरुवारी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहल्यात सहभागी झाले होते. जेजुरी ते वाल्हे प्रवासात दौंडज खिंडीजवळ त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दोन्ही नेते यावेळी टाल मृदंगाच्या गजरात तल्लीन झाले होते.
तावडे म्हणाले, सध्याचे राज्य सरकार वारकरयांच्या प्रश्नांबाबत उदासीन आहे. जेजुरीजवळ एमआयडीसीची २५ एकर जमीन असतानाही पालखी तळासाठी जमीन उपलब्ध करून दिली जात नाही. सरकारमधील जो तो पैशांच्या मागे लागला आहे, असाही आरोप त्यांनी केला. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकरही यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया
 एन  from BANGALORE
फारच छान! विचार अधिक मोकळेपणे वाहू देण्याऐवजी त्यांना बंदिस्त करू पहाणारे सरकार येणार का? मग काय! अच्छे दिन येणारच. 'बुरे' हा शब्द सार्वजनिक व्यवहारात वापरता येणार नाही असा कायदा केला कि झाले! किती सोपे आहे!!!
 paddy 
मुर्खा, श्रद्धेमुळे विचार चांगले होतात.विचारामुळे श्रद्धा वाढत नाही तर ती डगमगते.श्रद्धेने विचार केला तर प्रेम निर्माण होते.विचाराने श्रद्धा केली तर वासना निर्माण होते.श्रद्धेमुळे नाती निर्माण होतात.तर विचारामुळे संबंध तयार होतात,जे विचार बदलला कि संपतात. श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी.

माझे मत

ही आणखी एक अंधश्रद्धा. श्रद्धेमुळे विचार किती चांगले होतात ते 'मुर्खा' सारख्या संबोधनांमधून दिसतेच आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा एक अस्तित्वात नसलेला भेद काही जणांनी निर्माण केला आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक कुणालाही आजवर सांगता आलेला नाही. बाकी सारी वाक्ये ही टाळ्या पिटण्यापुरतीच आहेत. त्याचा वास्तवाशी काही संबंध नाहीच आहे. शब्द नुसते फेकायचे आणि सिद्ध काहीच करायचे नाही असा सगळा प्रकार! धन्य आहे!!